जिल्ह्यात आतापर्यंत ३१८ रुग्ण
जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील विविध ठिकाणी स्वॅब घेतलेल्या ४५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी प्राप्त झाले. यापैकी २० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून, तेवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये धरणगावचे सात, भुसावळ येथील चार, जळगावचे अकरा, चोपडा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.
आज सकाळी एक पॉझिटिव्ह
दरम्यान, आज दि. २० मे रोजी सकाळी भडगाव, जळगाव, चोपडा, अमळनेर, पाचोरा, चाळीसगाव, भुसावळ येथील स्वॅब घेतलेल्या ९५ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले. यामध्ये ९४ तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर जळगावातील एका ३० वर्षीय महिलेचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढून ३१८ झाली आहे. तर ३७ जणांचा मृत्यू झाला असून, ११० रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
चोपड्यातील संख्या १४ वर
दरम्यान, या अहवालात चोपडा येथील आदर्शनगरातील ७५ वर्षीय वृद्धाचा समावेश आहे. त्यामुळे चोपडा येथील करोनाबधितांची संख्या १४ वर गेली आहे.
नंदुरबारमध्ये एक पॉझिटिव्ह सापडला
तालुक्यातील रजाळे येथील ६६ वर्षीय पुरुषाचा अहवाल मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. हा रुग्ण एक महिना मुंबई येथे मुलीकडे राहिल्याची प्राथमिक माहिती आहे.
धुळे जिल्ह्यात करोना रुग्णसंख्या ८१ वर
साक्री तालुक्यातील बल्हाणे येथील ६५ वर्षीय रुग्णाची पत्नीही बाधित सापडली असून, शिरपूर शहरातही आता करोनाचा शिरकाव झाला आहे. येथील ५२ वर्षीय पुरूष करोनाबाधित झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. यानंतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या ८१ वर पोहोचली आहे. मंगळवारी दि १९ रात्री उशिरा प्राप्त अहवालानंतर जिल्ह्याची रुग्णसंख्या ८१ – धुळे – ६५, साक्री – ६, शिरपूर – ६, शिंदखेडा – ३, धुळे तालुका – १.