चोपडा (प्रतिनिधी) शहरात आज राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षातर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन करण्यात आले असून या यात्रेत पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख व खासदार अमोल कोल्हे हे येणार असून, जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधींनी यावेळी उपस्थिती द्यावी असे आवाहन पक्षातर्फे करण्यात आलेले आहे.
ही शिवस्वराज्य यात्रा सकाळी साडेनऊ वाजता शहरात दाखल होणार असून, पक्षीय पदाधिकाऱ्यांनी यावेळी रॅलीचे आयोजन केले आहे. त्यानंतर गो. भी. जिनिंग फॅक्टरी आवारात रॅलीचा समारोप होईल.
यानंतर सर्व नेत्यांची व वक्त्यांची भाषणे होतील आणि सभेचा समारोप होईल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी या सभेला उपस्थिती द्यावी, असे आवाहन तालुकाध्यक्ष यांनी केले आहे.
