पुणे (साथीदार वृत्तसेवा)
जळगाव जिल्हा फेस्कॉम संघटक श्री प्रमोद डोंगरे यांनी येथील एका कार्यक्रमात राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांची सदिच्छा भेट घेतली.
याप्रसंगी उभयतांनी ज्येष्ठ नागरिक समस्या निवारणार्थ केंद्र सरकारच्या योजनेतील रेल्वे प्रवास सवलती पूर्ववत सुरू करण्यात यावी, याविषयी मागणी केली. तसे सविस्तर निवेदनही डोंगरे यांनी दिले.
महाराष्ट्र शासनाच्या ज्येष्ठ नागरिक संदर्भातल्या धोरणास फेस्कॉमचा पाठिंबा व्यक्त केला. याप्रसंगी फेस्कॉमचे सदस्य उपस्थित होते.