चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चंद्रहासभाई गुजराथी यांची सहकार भारतीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. सदर निवड ही महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या त्रैवार्षिक अधिवेशन शिर्डी येथे साईचरणी संपन्न झाली.
या अधिवेशनात राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य राधाकृष्ण विखे पाटील, रिझर्व बँकेचे संचालक सतीश मराठे, माजी मंत्री प्रकाश आवाडे आदी मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनामध्ये महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यातून सहकारातील विविध संस्थांमार्फत काम करणारे दीड हजार प्रतिनिधींनी अधिवेशनात सहभाग घेतला.
चंद्रहासभाई यांचे साथीदार परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! – मुख्य संपादक