• Sat. Jul 5th, 2025


चोपडा (साथीदार वृत्तसेवा) श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील कॉलेज ऑफ फार्मसी चोपडा येथे २५ सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) उत्साहात साजरा करण्यात आला. प्राचार्य डॉ. गौतम पी. वडनेरे यांच्या मार्गदर्शनानुसार या दिवसानिमित्त फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाने ठरवून दिलेल्या विषयास अनुसरून औषधी व त्या औषधी पासून होणारे फायदे व दुष्परिणाम  *Adverse Drug Reaction (ADR)*  या विषयावर लोकहितासाठी विद्यार्थ्यांकडून जनजागृती करण्यात आली. विशेषतः चोपडा तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी आणि औषध निर्माता यांना भेटून योग्य ती माहिती दिली.

वैद्यकीय अधिकारी व  औषध निर्माता देत असलेल्या रुग्ण सेवेबद्दल त्यांचा कार्यगौरव महाविद्यालयातर्फे प्रशंसा पत्र देऊन करण्यात आला. IQAC यांच्या सौजन्याने कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात तृतीय वर्ष बी फार्मसी विद्यार्थ्यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी औषधांचे होणारे फायदे व दुष्परिणाम यांची माहिती काढुन रिपोर्ट तयार केला व तो शिक्षकांकडून तपासून घेतला.

जागतिक फार्मसिस्ट दिनानिमित्त वैद्यकीय अधिकारी व औषध निर्माता यांची थेट भेट घेऊन औषधी व त्यांचे होणारे फायदे व  दुष्परिणाम या विषयी योग्य ती माहिती असलेली यादी वैद्यकीय अधिकाऱ्यास व औषध निर्माता यांना देण्यात आली.

विद्यार्थांनी केलेल्या या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील, सचिव डॉ. स्मिता पाटील, संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आशाताई पाटील व प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे, प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे , शैक्षणिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. तन्वीर शेख तसेच सर्व विभाग प्रमुख डॉ. रागीब उस्मान, डॉ. भरत जैन, डॉ. संदीप पवार यांनी कौतुक व अभिनंदन केले.

कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी IQAC यांच्या प्रमुख डॉ. सुवर्णलता महाजन  तसेच विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी शिक्षक प्रा. सुवर्णलता महाजन,  प्रा.अतुल साबे,  प्रा. नलिनी मोरे, प्रा.कांचन पाटील, प्रा. जयेश निंबाळकर, प्रा. भूषण पाटील व प्रा.अल्फेज कुरेशी या सर्व शिक्षकांच्या सहकार्याने जागतिक फार्मसिस्ट दिन (World Pharmacist Day) हा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

कॉलेजची यशस्वी वाटचाल

सन 1992 मध्ये महात्मा गांधी शिक्षण मंडळ  संचलित औषधनिर्माणशास्र महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. 

तालुक्यातील एनबीए (NBA) व  नॅक मानांकित (NAAC), आय एस ओ (ISO) प्रमाणित महाविद्यालय आहे.

बी. फार्म अभ्यासक्रमासाठी प्रवेश क्षमता 100 जागांची आहे तसेच एम. फार्म फार्माकॉग्नोसी (Pharmacognosy) पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 10 जागांची प्रवेश क्षमताआहे.

एम. फार्म फार्मास्युटिक्स (Pharmaceutics) या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम यासाठी 12 जागांची क्षमता आहे.

एम. फार्म क्वालिटी ॲशयुरन्स (Quality Assurance) हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सुरू झालेला आहे.

पी.एच. डी अभ्यासक्रम  पण महाविद्यालयात सुरू आहे.

वर्ष 2020 यावर्षीपासून डिप्लोमा इन फार्मसी (D. Pharm) हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.