धुळे (साथीदार वृत्तसेवा) विशाल खान्देशचे नेते, माजी मंत्री, खान्देश भूषण दाजीसाहेब रोहिदास पाटील यांचे दि. २७ सप्टेंबर २०२४, शुक्रवार रोजी सकाळी ११ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या, शनिवार दि. २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील निवासस्थानापासून निघेल. शहरातील एसएसव्हीपीएस कॉलेज ग्राउंडवर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अंत्यदर्शन शनिवार, दि २८ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत नेहरू हौसिंग सोसायटी, देवपूर, धुळे येथील सुंदर सावित्री सभागृहात घेता येईल.