मुंबई (साथीदार वृत्तसेवा) यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने यशवंतराव चव्हाण ज्येष्ठ नागरिक राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला. हा सन्मान आज, मुंबई येथे वाय. बी. सेंटर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
यासाठी महाराष्ट्रातील विविध भागातील कार्यशील पाच ज्येष्ठ नागरिकांची सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण जेष्ठ नागरिक एका संघाची राज्यस्तरीय कृतज्ञता सन्मान घोषित करण्यात आला आहे. त्यात संघ, संस्थेच्या सन्मानासाठी फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभागात सर्वप्रथम स्थापन झालेला व विविध कार्यक्रमांचे सदैव आयोजन करणाऱ्या चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ, जळगाव येथील संघाची निवड करण्यात आली आहे. या सन्मानाचे स्वरूप रोख रक्कम, सन्मानचिन्ह व मानपत्र आज, रविवारी, दि. 6 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई येथे वाय. बी. सेंटर येथे प्रदान करण्यात येणार आहे.
फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभागाच्या दृष्टीने ही अभिमानाची बाब आहे. यासाठी चैतन्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाचे आजी-माजी अध्यक्ष व कार्यकारणीचे सदस्यांचे फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व त्यांना शुभेच्छा. शुभेच्छुक प्राचार्य श्री. बी. एन. पाटील सचिव, फेस्कॉम खान्देश प्रादेशिक विभाग, धुळे