• Sun. Oct 5th, 2025

माजी सरपंच सविता शिरसाठ यांचा नाशिक येथे अपघाती मृत्यू

Loading

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) चोपडा तालुक्यातील अनवर्दे खुर्द येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते आदिवासी सेवक संजीव पांडुरंग शिरसाठ यांच्या पत्नी माजी सरपंच सौ. सविताबाई संजीव शिरसाठ यांचे आज दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री १०:२५ वाजता अपघाती मृत्यू झाला. या घटनेचे वृत्त गावभर पसरताच सर्वत्र शोककळा पसरली.

सविताबाई शिरसाठ ह्या घटस्थापनेच्या प्रथम दिवशी सप्तश्रृंगी गडावर देवी दर्शनासाठी जायला निघाल्या असतांना नाशिक येथील तात्पुरत्या निवासाजवळून अवघ्या हाकेच्याअंतरावर असलेल्या जत्रा हॉटेलजवळील मार्गावरून जात असताना कमकुवत कामाचे लेअर खचल्याने मोटार सायकलवरून पडून मेंदूला जबर दुखापत झाली. नाकातून व तोंडातून व कानातून अति रक्तस्राव होत असल्याने तत्काळ लोकमान्य हॉस्पिटलला उपचारार्थ दाखल करण्यात आले. जवळपास तीन दिवस मृत्यूशी झुंज देत असतांना आज प्राणज्योत मालवली. त्या पत्रकार महेश शिरसाठ व कैलास शिरसाठ यांच्या भावजयी असून, त्यांच्या पश्चात इंजि. पवन व इंजि. अनुष्का ही दोन मुले आहेत.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.