• Sat. Jul 5th, 2025

भाजपकडून महाराष्ट्र बचाव आंदोलनास सुरुवात; चोपडा तालुका शाखेकडून तहसीलदारांना निवेदन

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) मंगळवारी दि.१९ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या लोकप्रतिनिधी,
पदाधिकार्‍यांकडून महाराष्ट्र बचाव आंदोलन करण्यात आले. चोपड्यातही भाजपच्या तालुका पदाधिकारी यांनी तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन देत राज्य सरकारचा निषेध केला. 

करोना रोखण्याकामी अपयशी ठरलेल्या राज्याच्या सरकारला काम करण्यास भाग पाडण्याच्या हेतूने भाजपकडून राज्यभर हे आंदोलन करुन निवेदन देण्यात येत आहे. यानुसार चोपडा तालुका भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधी, तालुका  पदाधिकारी यांनी चोपडा तहसीलदार अनिल गावित यांना निवेदन दिले.

निवेदनामध्ये करोनाबाधित रुग्णसंख्येत देशात महाराराष्ट्र सर्वोच्च स्थानी आहे. म्हणून संकटकाळामध्ये राज्य शासनाने जनतेला वार्‍यावर न सोडता आपले कर्तव्य बजवायला हवे, केंद्र शासनाच्या गाईडलाईनचे पालन व्हावे, केंद्र शासनाने अनेक प्रकारची मदत राज्य शासनाला करोनाविरोधात लढण्यासाठी दिली आहे, तरीही जनतेला त्याचा लाभ मिळत नाही आहे, जनता हवालदिल झाली आहे,
राज्यांचे परिवहन मंत्र्यांनी स्थलांतरीत मजुरांसाठी मोफत बसची व्यवस्था करण्याची फसवी घोषणा केली. प्रत्यक्षात मात्र बसची सोय केली नाही त्यामुळे असंख्य मजूरवर्ग पायी रस्त्यांने प्रवास करीत आहेत त्यांना वाली कुणीच नाही यासारखे आरोप यात करण्यात आले आहेत.
राज्यात वृत्तपत्र वितरणावर बंदी घालणार्‍या या राज्य सरकारने दारुची दुकाने सुरु करण्याकामी तत्परता दाखविली. राज्य शासनातील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, राज्य सरकार हे स्वत: च्या स्वार्थामध्ये कार्यमग्न आहे असे आरोपही या निवेदनात केलेले आहेत.

शेतकर्‍यांचर हाल होत आहेत, राज्य शासन शेतमाल खरेदी करीत नाही आहे. कापूस पीक विम्याची रक्कमही देत नाही. तसेच मागील महिण्यात आलेल्या वादळ, गारपीट, अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या  शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. त्यामुळे वरील सर्व नकारात्मक बाबींचा चोपडा तालुका भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिकांकडून तीव्र निषेध यावेळी करण्यात आला.  करोना संरक्षणार्थ राज्य शासनाने तातडीने पावले उचलुन त्याला अटकाव करावा, महाराष्टाच्या सर्वसामान्य जनतेसाठी आर्थिक पॅकेज घोषित करावे. तसेच,शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करुन द्यावे, राज्य सरकारने रेशनचे धान्य फक्त मे-जूनचे न देता एप्रिल महिन्याचेही वितरण करावे,
प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेची राज्यस्तरावर स्थगित केलेली रक्कम त्वरीत शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करावी, संजय गांधी निराधार योजने अंतर्गत मिळणारे अर्थसहाय्य त्वरीत लाभार्थ्याच्या खात्यात जमा करावी, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटची उपलब्धता करावी, राज्यातील जनता आर्थिक संकटात असल्याने संकटकाळात एप्रिल-मे-जून असे तीन महिन्यातील घरगुती वीजबिल पूर्णपणे माफ करावे यासारख्या अनेक मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

चोपड्यातील इतर रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याची मागणी
चोपड्यातील खासगी दवाखान्यांमध्ये इतर सर्वसामान्य आजारांसाठी रुग्ण उपचारासाठी आल्यावर खासगी डाॅक्टर रुग्णांची तपासणी न करता त्यांना कुत्र्यांसारखी वागणूक देतात, हाकलुन लावतात (या डाॅक्टरांमुळे अनेक रुग्ण दगावले आहेत) अशा डाॅक्टरांची चौकशी करुन त्वरीत कडक कारवाई शासनाने करावी व चोपड्यातील इतर रुग्णांना त्वरीत वैद्यकीय सेवा देण्याचा आदेश द्यावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. निवेदन देतेवेळी प्रदिपभाऊ पाटील (उत्तरमहाराष्ट्र प्रमुख, ओबीसीसेल, भाजप), पंकज पाटील (तालुकाध्यक्ष), राकेश पाटील (जिल्हा चिटणीस), गजेंद्र सोनवणे (जि.प.सदस्य), भूषण भिल (उपसभापती चोपडा पं.स.), धनंजय पाटील (संचालक चो.कृ.उ.बा.समिती), प्रकाश पाटील, भरत सोनगिरे, दत्तात्रय पाटील, मोहित भावे आदी उपस्थित होते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.