ग्रामीण पोलीस स्टेशनची मोठी कारवाई
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील ग्रामीण पोलिस स्टेशन अंतर्गत 45 लाखाचा गांजा पकडण्यात आला. मात्र, पोलिसांना गुंगारा देवून आरोपी फरार झाला. याबाबत पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या मालापूर शिवारात नाबार्डच्या कंपार्टमेंट 211 च्या शेतीतील लागवड असलेल्या गांजाची शेती कसत असल्याचे गुप्त माहिती मिळाल्यावरून दिनांक 6 ऑक्टोबर रोजी साडेअकरा वाजेच्या सुमारास चोपडा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर व यांची टीम गेली असता यांना सदरील शेतात गांजाची शेती करत असल्याचे दिसले यावरून त्या शेतीतील गांजाची रोप उपटून काढले. दिनांक सात ऑक्टोबर रोजी सकाळी चार वाजेपर्यंत ही कारवाई चालली. या कारवाईत 750 किलोग्रॅमचे ओला गांजा आढळला. त्याची किंमत जवळपास 45 लाख रुपयांच्या घरात असावी असा अंदाज गुन्हा नोंद मध्ये केलेला आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी रुमल्या चेचऱ्या पावरा (रा. डॅडीया पाडा ता. चोपडा) यांच्या शेतात गांजाची शेती आढळून आली. पोलीस गाडी आली असता आणि आरोपीच्या लक्षात आल्याने तो फरार झाला. याबाबत फिर्यादी पोलीस हेडकॉन्स्टेबल चेतन सुरेश पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी रुमाल्या चेचऱ्या पावरा यांचाविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर, पोलीस उपनिरीक्षक शेषराव नितनवरे
पो. हे. कॉ. गणेश मधुकर पाटील करीत आहेत.