डॉ. अक्षय पाटील यांचे मत
चोपडा (प्रतिनिधी) आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर परिस्थिती ला दोष द्यायचा नसतो तसेच आलेल्या किंवा मिळालेल्या परिस्थिती तुन मार्ग काढून आपला मार्ग सुकर करून यशस्वी व्हायचे असते, असे मत डॉ. अक्षय पाटील यांनी आपल्याला आलेल्या अनुभवातून कथन केले. चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयात सॉफ्ट स्किल्स या विषयावरील व्याख्यान आयोजित केले होते.
सदरील व्याख्यानासाठी कॅनडा येते कार्यरत महाविद्यालयाचे अल्युमिनी डॉ. अक्षय पाटील यांना आमंत्रित केले होते. डॉ पाटील यांनी सॉफ्ट स्किल्स कश्या विकसित करायच्या आणि त्याची सुरुवात स्वतःपासून करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासोबत आपले राहणीमान बदलणे किती महत्त्वाचे आहे हेदेखील विषद केले. डॉ. पाटील सध्या व्हिक्टोरिया ऑर्डर ऑफ नर्सेस येते प्लानिंग अँड शेडुलिंग या विभागात कार्यरत असून, सोबत एनटीपी या कंपनीचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहत आहेत. प्रा. डॉ. तन्वीर शेख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. संदीप पवार यांनी केले.

महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अँड. भैय्यासाहेब संदीप पाटील सचिव डॉ. सौ. स्मिताताई पाटील, प्राचार्य प्रा. डॉ. गौतम वडनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागप्रमुख प्रा. डॉ. भरत जैन, प्रा. डॉ. मो. रागीब, प्रा. डॉ. के. सी. पाटील, प्रा. सौ. नलिनी मोरे, प्रबंधक श्री. प्रफुल्ल मोरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.