• Wed. Feb 4th, 2026

चोपडा (साथीदार वृत्तसेवा) आगामी नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून, भाजप कार्यकर्ते व बूथ प्रमुख यांनी आपल्या तयारीस लागावे, असे आवाहन भाजप शहराध्यक्ष नरेंद पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.

महायुती की स्वबळावर लढवावे, हे वरिष्ठ पातळीवर लवकरच निश्चित होईल, असा आशावाद व्यक्त करीत पाटील पुढे म्हणाले, प्रशासन पातळीवर प्रभाग रचना, मतदार पुनर्निरीक्षण,नगराध्यक्ष आरक्षण सोडत आदी प्रकिया पूर्ण झाल्याने दीपोत्सवनंतर कोणत्याही क्षणी निवडणूक घोषणा होऊन आचारसंहिता लागणार आहे. त्यासाठी सर्व कार्यकर्ते व समर्थकांनी आपला जनसंपर्क वाढवत मतदारांपर्यंत पोहोचले पाहिजे.

चोपडे न. प. च्या प्रभाग व त्यांच्या आरक्षण बाबत नुकतीच जाहीर झालेली रचना पुढीलप्रमाणे

प्रभागनिहाय सोडत

प्रभाग १*अ ओबीसी, ब जनरल महिला

प्रभाग २*अ ओबीसी महिला, ब जनरल

प्रभाग ३*अ SC महिला, ब जनरल

प्रभाग ४*अ SC, ब जनरल महिला

प्रभाग ५*अ ओबीसी महिला, ब जनरल

प्रभाग ६*अ ओबीसी महिला, ब जनरल

प्रभाग ७*अ जनरल महिला, ब जनरल

प्रभाग ८*अ ओबीसी, ब जनरल महिला

प्रभाग ९*अ जनरल महिला, ब जनरल

प्रभाग १०*अ ओबीसी महिला, ब जनरल

प्रभाग ११*अ जनरल महिला, ब जनरल

प्रभाग १२*अ ओबीसी ब जनरल महिला

प्रभाग १३*अ जनरल महिला, ब जनरल

प्रभाग १४*अ ST, ब जनरल महिला

प्रभाग १५*अ ST महिला, ब ओबीसी, क जनरल महिला

यात एकूण पंधरा प्रभागांपैकी चौदा प्रभाग द्विसदसीय असून, पंधराव्या प्रभागात तीन सदस्य असे एकूण 31सदस्यांत पंधरा महिला सदस्य निवडून येणार आहेत. महायुती झाली तर पक्षांच्या प्रभावानुसार जागा वाटप होऊ शकते.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.