जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३८१
जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, यावल, पाचोरा, जळगाव, एरंडोल येथील स्वॅब घेतलेल्या करोना संशयित व्यक्तीपैकी १०८ व्यक्तींचे तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले. त्यापैकी ७८ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर तीस व्यक्तीचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, सकाळी आलेल्या अहवालात ५ संशयित पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगावातील सव्वीस, भुसावळ येथील तीन तर एरंडोल येथील एका व्यक्तीचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णसंख्या ३८१ इतकी झाली असून, आतापर्यंत १३९ रुग्ण करोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. तर ४४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.