नाशिक ( साथीदार वृत्तसेवा) उत्तर महाराष्ट्र व सामाजिक क्षेत्रात पत्रकारिता व सामाजिक सेवेत अग्रणी व्यक्तिमत्व, ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक श्री अनिलकुमार द्वारकादासजी पालीवाल यांना वृंदावन(मथुरा)येथील पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठातर्फे सामाजिक सेवा क्षेत्रात पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल उद्या दिनांक एक फेब्रुवारी २०२६ रोजी “विद्या वाचस्पती सारस्वत सन्मान” पीएचडी डॉक्टरेट पदवी प्रदान केली जाणार आहे.

सदर कार्यक्रम बसंत विहार, हॉटेल रेडिसन ब्ल्यू येथे आयोजित केला असून यात इतर क्षेत्रात उल्लेखनीय भूमिका बजावणाऱ्या मान्यवरांना देखील सन्मानित केले जाणार आहे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे कुलपती डॉ. इंदूभूषण मिश्रा हे असून मुख्य अतिथी म्हणून पद्मश्री डॉ. अरविंद कुमारजी (कुलपती,झांसी) हे उपस्थित राहणार आहेत.तर मुख्य वक्ता डॉ. ऋतु दुबे, तिवारीजी (शिक्षाविद व साहित्यिक) हे मार्गदर्शन करणार आहेत. याप्रसंगी विश्व रेकॉर्डेड व पर्यावरणविद डॉ. विश्वनाथ पानिग्रही(छत्तीसगढ) हे उपस्थित राहणार आहेत.
