• Wed. Feb 4th, 2026

जळगाव : येथील श्यामा प्रसाद उद्यानात जिल्हा साहित्य विकास मंडळातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त सोमवार रोजी कविसंमेलन आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी भुसावळ येथील ज्येष्ठ कवी काशिनाथ भारंबे (कवी निर्मोही) हे होते.


प्रारंभी कविवर्य सुशील पगारिया. अक्षर वैदर्भीचे सावरकर, सुरेश यशवंत आणि साहित्य क्षेत्रातील दिवंगत यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक जिल्हा साहित्य मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ कविवर्य गोविंद देवरे यांनी केले.


कार्यक्रमात पुढे कवी आणि पोलीस दलातून (सी. आय. डी.) ए. एस.आय. म्हणून सेवानिवृत्त झालेले अरुणकुमार जोशी यांच्या अंतर्मनातील एकांत स्वर आणि पत्र संवाद या पुस्तकांचे प्रकाशन गोविंद देवरे यांच्या हस्ते करण्यात आले.


या वेळी राजेंद्र गाडगीळ, किशोर गायकवाड, किशोर पी. पाटील, धनराज सोनवणे, ज्येष्ठ पत्रकार शिवलाल बारी, संतोष साळवे, सुखदेव वाघ, अरुण वांद्रे, उमाकांत वाणी, गोविंद देवरे, अरुण कुमार जोशी आणि संमेलनाचे अध्यक्ष काशिनाथ भारंबे यांनी अध्यक्षीय मनोगत मांडून कविता सादर केल्या.  कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सुखदेव वाघ यांनी तर आभारप्रदर्शन किशोर पी. पाटील यांनी केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.