• Wed. Feb 4th, 2026

चोपडा (प्रतिनिधी) शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात 26 जानेवारी रोजी सकाळी आठ वाजून पंधरा मिनिटांनी संघाचे अध्यक्ष जयदेव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

ध्वजवंदना व सामूहिक राष्ट्रगीत यावेळी म्हणण्यात आले. ज्येष्ठ नागरिक व मा जी नगराध्यक्ष, रमणलाल जी गुजराती, विश्वनाथ साळुंखे , विजय करोडपती रमेश तात्या शिंदे , जिजाबराव नेर पगारे, गोविंदा बापू महाजन, श्याम भाई गुजराती, प्रमोद डोंगरे, संजय बजाज, दिलीपराव पाटील, परशुराम पेंढारकर, डी आर परदेशी,  महाजन, नलिनीताई पाटील, मधुकर साळुंखे, हाफिज अली, एकनाथ पाटील रामकृष्ण महाजन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सुखदेव वाघ यांनी तर आभारप्रदर्शन किशोर पी. पाटील यांनी केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.