धुळे – (साथीदार वृत्तसेवा) धुळे येथील श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातून आणखी दोन रुग्णांना डिस्जार्च देण्यात आला आहे. गुरुवारी दि २१ मे रोजी त्यांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले. यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे धुळे जिल्ह्यातून करोना विषाणूपासून मुक्त झालेल्यांची संख्या ४७ झाली आहे. जिल्ह्यात करोनाचे एकूण ८१ रुग्ण सापडले असून, त्यापैकी ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर ४७ जण करोनामुक्त झाले आहेत.