• Wed. Feb 4th, 2026

श्री बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे हिवाळी श्रमसंस्कार शिबिरात युवा प्रेरणाबद्दल मार्गदर्शन

नंदुरबार (अनिलकुमार पालीवाल)
दि. 28 जानेवारी 2026 रोजी श्री. बटेसिंग भैय्या रघुवंशी विधी महाविद्यालयातर्फे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, दुधाळे येथे आयोजित विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात  युवा प्रेरणा या विषयावर डॉ. मनोज शेवाळे यांनी मार्गदर्शन करतांना युवांनी कसे जगावे आणि युवांचे कार्य काय आहे हे स्पष्ट केले. देशासाठी, समाजासाठी युवा कशाप्रकारे  उपयुक्त होऊ शकतात याविषयी विस्तृत माहिती दिली. रा.से.यो.स्वयंसेवक हर्षल शिंदे यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार प्रदर्शन सुप्रिया गारुंगे यांनी व्यक्त केले.


या प्रसंगी रा.से.यो.च्या कार्यक्रम अधिकारी प्रो. डॉ. आशा तिवारी, मॅडम व सह. कार्यक्रमाधिकारी प्रो. दिनेश गावीत सर  हे देखील उपस्थित होते.


*दुपारचे द्वितीय सत्र*
श्रमसंस्कार शिबिराच्या पाचव्या दिवसाच्या दुपारच्या सत्रात “भाषेचे ज्ञान” या विषयावर डॉ. माधव कदम सर यांनी मार्गदर्शन केले. यांनी  भाषेची ज्ञान कसं असावे भाषा कशी बोलली जाते,भाषेचे किती प्रकार असतात भाषेमध्ये कोणकोणत्या गोष्टी आढळतात याची विस्तृत माहिती दिली. खूप चांगल्या प्रकारे भाषेचे प्रयोग व दुरुपयोग यावर खूप चांगले मार्गदर्शन केले.रा.से.यो.स्वयंसेवक हर्षल शिंदे यांनी सूत्रसंचालन  केले आणि आभार प्रदर्शन मोहिनी गावीत यांनी केले.या प्रसंगी रा.से.यो.च्या कार्यक्रम अधिकारी डॉ.आशा तिवारी,व सहकार्यक्रमाधिकारी प्रा.दिनेश गावीत आदी उपस्थित होते. त्यानुसार  NSS चे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका यांनी शिबिरातील संपूर्ण कार्यक्रमाचा लाभ घेतला.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.