• Wed. Feb 4th, 2026

भारतीय तटरक्षक दलाचे जवान अभिजीत जाधव यांची गावात सवाद्य मिरवणूक

चोपडा..(अनिलकुमार पालीवाल) तालुक्यातील आदर्श गाव आडगाव येथील शेतकरी कुटुंबातील दुग्ध व्यावसायिक गजानन दत्तू पाटील यांचे चिरंजीव अभिजीत गजानन जाधव याची नुकतीच कोची येथे भारतीय तटरक्षक दलात नियुक्ती करण्यात आल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केला असून तटरक्षक दलात भरती नंतर पहिल्यांदाच तो आडगाव येथे आला असता गावकऱ्यांनी डीजेच्या तालावर, राष्ट्रभक्तीपर गीतांच्या वाद्यात त्याचे जल्लोषात स्वागत केले.अभिजीत गजानन जाधव हा यापूर्वी नाशिक येथे शिकत होता. भारतीय तटरक्षक दलात भरती अलीकडच्या काळात आडगावचा एकमेव तरुण आहे. नेव्ही — सीनियर सेकंडरी रिक्रुटमेंट( एस. एस आर. ) पदावर त्याची नेमणूक झाली आहे.

गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शेतकी संघाचे प्रेसिडेंट सुनील डोंगर पाटील , प्रकाश पाटील,आजी श्रीमती मनुबाई,आई सौ. सरिता गजानन पाटील,कवी लेखक तथा साहित्यिक रमेश जे.पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते सौरभ कुलकर्णी,फारुक शेख,व गावातील असंख्य तरुणांनी देशभक्तीपर गीत आणि डीजेच्या तालावर जवान अभिजीत पाटील यांचे स्वागत व अभिनंदन केले.


प्रतिष्ठितांनी केला सत्कार
आडगाव येथे अभिजीत जाधव याचे आगमन होताच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक डी. बी.पाटील,सैन्य दलातील जवान प्रदीप पाटील, माजी सरपंच ताराचंद तुकाराम पाटील, शेतकी संघाचे संचालक शामकांत बापू पाटील,डॉ. विजय डी.पाटील, प्रगतिशील शेतकरी अंबादास पाटील आदी मान्यवरांनी त्याचे सत्कार व स्वागत केले.तसेच गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सरपंच,उपसरपंच विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे आजी-माजी संचालक,चोपडा साखर कारखाना, शेतकी संघ, तापी शेतकरी सहकारी सूतगिरणी, संचालक व सहकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.