• Wed. Feb 4th, 2026

चोपडा .(अनिलकुमार पालीवाल)
येथील स्व.शरदचंद्रिका अक्का  पाटील न. प.नाट्यगृहात काल दि.1 फेब्रु.रोजी महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या श्रद्धांजली सभेत सर्व पक्ष नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. स्वर्गीय अजितदादा यांच्या निधनाने आपण खूप गलबलून गेलो होतो, जणू काही घरचाच माणूस निघून गेला आहे असे सर्वांना वाटत होते. स्पष्ट, निर्भीड, सडेतोड, असं हे व्यक्तिमत्व काटेकोरपणे वेळेचे बंधन पाळत होते. चोपडा तालुक्यावर अजित दादा चे खूप मोठे उपकार राहिले आहेत. आपण साऱ्यांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे असे प्रतिपादन महाराष्ट्र विधानसभेचे माजी सभापती अरुण भाई गुजराती यांनी येथे केले. आपल्या शोक भावना व्यक्त करताना गुजराती पुढे म्हणाले की, शरचंद्रजी पवार साहेबांच्या पठळीत अजित दादांनी खूप खूप काही शिकले, राजकारण करताना या माणसाने कधीही जात धर्म पंथ पाळला नाही.कार्यकर्त्यांची कामे केली म्हणून लाखोंचा जनसमुदाय त्यांच्यासाठी रडला. जणू महाराष्ट्र थांबला,सारे काही स्तब्ध…वातावरण निःशब्द….असेही यावेळी बोलताना सांगितले.

याप्रसंगी नगराध्यक्षा सौ.नम्रता पाटील,सौ.इंदिराताई पाटील, उपनगराध्यक्ष पंकज बोरोले, पियुष पाटील, जितेंद्र पाटील, शशिकांत पाटील, माजी नगराध्यक्षा जयाताई पाटील,सौ.रोहिणी पाटील, अडावद येथील जहीर भाई, काझी, भाजप नेते शांताराम पाटील,ॲड. संदीपभैया पाटील, माजी आमदार दिलीप तात्या सोनवणे, माजी आमदार कैलास बापू पाटील, भाजपचे तालुकाध्यक्ष कांतीलाल पाटील, शिंदे सेनेचे नगरसेवक, शेतकरी  संघाचे प्रेसिडेंट सुनील डोंगर पाटील, करण अग्रवाल, हातेड आश्रम शाळेचे चेअरमन राजेंद्र पुंडलिक सोनवणे, मधुकर आबा पाटील, राजू बिटवा पाटील, सूतगिरणी उपाध्यक्ष व संचालक मंडळ सदस्य, शेतकी संघाचे व्हाईस प्रेसिडेंट बाळकृष्ण सोनवणे, व संचालक अनेक आजी-माजी नगरसेवक तसेच पदाधिकारी, प्रवीण भाई गुजराती, राष्ट्रवादी काँ.पक्षाचे सुनील पाटील, देवेंद्र सोनवणे(उबाठा) डॉ.चंद्रकांत बारेला, शशी देवरे, मार्केट उपसभापती विनायक चव्हाण,आदींनी शोक भावना व्यक्त करीत दादांच्या स्मृतींना भावपूर्ण वंदन केले. सूत्रसंचालन बोरसे यांनी केले. शेवटी सर्वांनी मौन पाळून स्व .दादांना श्रद्धांजली अर्पण केली.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.