• Wed. Feb 4th, 2026

चावंड येथे मध्यरात्री श्रद्धांजली
धुळे (साथीदारवृत्तसेव) स्वराज्य, स्वाभिमान व राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक असलेल्या वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंहजी यांच्या ४२९ व्या तिथीनुसार पुण्यतिथीनिमित्त आज मध्यरात्री ठीक १२.०० वाजता चावंड (राजस्थान) येथील त्यांच्या समाधीस्थळी भावपूर्ण वातावरणात दर्शन व पुष्पांजली अर्पण करण्यात आली. तर सकाळी ११:०० वाजता शेकडोंच्या संख्येने महाराणा प्रताप यांना सार्वजनिक श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

याप्रसंगी महाराणा प्रताप स्मारक अभियान च्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्रविरसिंहजी नमाना यांच्या नेतृत्वाखाली महाराणा प्रतापसिंहजी यांच्या समाधीस्थळाच्या जिर्णोद्धाराचे कार्य हाती घेण्यात आले असून, या पवित्र व ऐतिहासिक कार्यासाठी देशभरातील विविध स्तरांतून सहकार्य व मदत मिळत आहे. पुण्यतिथीनिमित्त आयोजित श्रद्धांजली व पुष्पांजली कार्यक्रमास महाराणा प्रताप स्मारक अभियान समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री. चंद्रवीरसिंह नमाणा, श्री. अभिराजसिंग राठोड, श्री. रविंद्रसिंह राजावत, श्री. मंथनपंचोली, श्री. अजयसिंग शक्तावत, श्री. रणधीरसिंह ठाकुर, श्री. मंगलसिंग पंडितसिंग राजपूत (भोरखेडा), अमृतसिंग सिसोदिया (बेलदा), प्रदिपसिंह राजपूत (भावेर),
सचिन राजपूत (सावळये), जयपालसिंह निरास (पिपरी),
शक्ति सिह राजपत (बिरवाडा), जसपालसिह राजपूत (टेंबे), विरपालसिह राजपत्त (शिरपूर), योगेश राजपूत (भटाणे), संदीप राजपूत (नाणे) आदी मान्यवर, पदाधिकारी व वीरप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थितांनी महाराणा प्रतापसिंहनी यांच्या पराक्रम, त्याग व स्वराज्यनिष्ठेला अभिवादन करत त्यांच्या स्मृतीस विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. चावंड ही महाराणा प्रतापसिंहजी यांच्या जीवनातील अखेरची राजधानी असून, येथील समाधीस्थळ हे राष्ट्रभक्ती व इतिहासाचे जिवंत स्मारक मानले जाते. समाधीस्थळाच्या जिणों द्वारामुळे हा वारसा पुढील पिढघांसाठी अधिक सुदृढ व प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.