जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना स्मृतिदिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी विनम्र अभिवादन केले आहे.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा दिली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, उपजिल्हाधिकारी (महसुल) रविंद्र भारदे, विशेष भूसंपादन अधिकारी किरण सावंत-पाटील, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, नायब तहसीलदार रविंद्र मोरे, यांचेसह जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरातील शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचार विरोधी प्रतिज्ञा घेतली.