• Sun. Feb 15th, 2026

स्व. राष्ट्रभक्त पंडित दीनदयालजी उपाध्याय यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली

*थोर तत्त्वचिंतक व एकात्म मानवता वादाचे व अंत्योदय विचारांचे प्रणेते स्व.राष्ट्रभक्त पंडित दीनदयालजी उपाध्याय* यांच्या स्मृती दिनी त्यांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली


मी भाग्यवान… सर्वात धनवान
या अर्थाची एक काव्यपंक्ती या अनुषंगाने उद्धृत करू इच्छितो.
नुकत्याच पंडित दीनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,
वृंदावन,मथुरातर्फे नवी दिल्ली येथील हॉटेल रेडिसन ब्ल्यू, मध्ये आयोजित पदवी प्रदान समारंभात मला मी माझ्या पन्नास वर्षाहून अधिक काळ ग्रामीण पत्रकारितेतून केलेल्या सामाजिक सेवेच्या गौरवार्थ पीएचडी(डॉक्टरेट) म्हणजेच विद्या वाचस्पतीच्या पदवीने सारस्वत सन्मान करण्यात आला.

मी आतापावेतो जी काही थोडकी समाजसेवा केली असेल..त्याचा हा गौरव आहे.माझे पिताश्री पूजनीय बाबूजी यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाचे माध्यमातून मला बालपणापासून मिळालेले  रा.स्व.संघ संस्काराचे विचार व त्यांच्या माध्यमातून मी केलेले समाजसेवेचे कार्य ह्याची दखल ह्या निमित्ताने घेतली गेली,असे मी मानतो.

आपल्या सर्व ज्येष्ठ संघ, जनसंघाचे, भाजपचे एव्हढेच नव्हे तर विरोधी पक्षाच्या व विचारांच्या हजारो मित्रांनीदेखील शुभेच्छा देत अभिनंदन केले. हिच शिदोरी जीवनभर पुरेशी आहे, असे मी मानतो. भविष्यात देखील आपल्या सर्वांचे अनमोल सहकार्य व मार्गदर्शन सतत मिळत राहील, ह्या विनम्र अपेक्षेसह.


…सदैव आपला सेवाभावी…
डॉ.अनिलकुमार द्वा.पालीवाल
चोपडा, जिल्हा जळगाव

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.