• Sun. Feb 15th, 2026

जिल्हाधिकारी घुगे यांची विभागीय रेल्वे व्यवस्थापक अग्रवाल यांच्याशी चर्चा


जळगाव (जिमाका / डॉ.अनिलकुमार पालीवाल) जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट घेऊन रेल्वे प्रशासन व जिल्हा प्रशासन यांच्यातील परस्पर समन्वय अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने विविध प्रशासकीय विषयांवर सविस्तर चर्चा केली.


या बैठकीत नाशिक–त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कुंभमेळा अनुषंगाने जिल्हा प्रशासन व रेल्वे प्रशासन यांच्या संयुक्त समन्वयातून करावयाच्या आवश्यक पूर्वतयारी व कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यात आला. कुंभमेळ्याच्या कालावधीत प्रवासी सुविधा, वाहतूक नियोजन व सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजनांवर चर्चा झाली.
तसेच जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध रेल्वे लाईन प्रकल्पांसाठी भूसंपादन प्रक्रियेतील अडचणी, सक्षम प्राधिकारी (भूसंपादन) यांना भेडसावणाऱ्या समस्यांचे निराकरण तसेच भूसंपादनाची कार्यवाही अधिक गतीमान करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.


याशिवाय इतर प्रशासकीय व समन्वय विषयक बाबींवरही सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीद्वारे रेल्वे व जिल्हा प्रशासनामधील समन्वय अधिक दृढ ठेवून प्रकल्पांची वेळेत व सुस्थितीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याबाबत सकारात्मक भूमिका निश्चित करण्यात आली.
जिल्हा प्रशासन, जळगाव सार्वजनिक सुविधा व पायाभूत विकासाच्या कामांसाठी रेल्वे प्रशासनासोबत सातत्यपूर्ण समन्वय राखत कार्यरत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.