सह्याद्री फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम
चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) तालुक्यातील वर्डी गावामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन सह्याद्री फाउंडेशनच्या प्रयत्नांनी वर्डी गावात सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करण्यात आली.
यापूर्वीही सह्याद्री फाउंडेशनने बाराशे मास्क व एक हजार साबणाचे वाटप केले होते. या वेळी फौंडेशनचे अध्यक्ष प्रा. विकास हिम्मतराव शिंदे यांनी लोकांना करोनापासून सावध राहण्याचे आवाहन केले. या फवारणीसाठी जिल्हा परिषदेच्या सभापती सौ ज्योतीताई राकेश पाटील यांनी ४० लिटर सोडियम हायपोक्लोराईड स्वखर्चाने दिले. तसेच भाजपचे शहराध्यक्ष गजेंद्रभाऊ जैस्वाल व नगराध्यक्ष जीवनभाऊ चौधरी यांनी फवारणी यंत्र उपलब्ध करून दिले.
याप्रसंगी फाउंडेशनचे विकास हिम्मतराव शिंदे, कार्यकारणी सदस्य विवेकश्री गुर्जर ,लहुश नायदे, मिलिंद साळुंखे, सचिन शिंदे, हर्षल शिंदे, महेंद्र पाटील, नितीन शिंदे, योगेश शिंदे, संदीप शिंदे, सुशील साळुंखे, विजय साळुंखे, कुणाल शिंदे, हारून पिंजरी, आमिन पिंजरी, गणेश चव्हाण, दीपक पाटील, इदुभाऊ पिंजारी, भाजपचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील चिटणीस राकेश पाटील, माजी जिप सदस्य बाळासाहेब पाटील, हिम्मतराव शिंदे, नंदलाल शिंदे, पोलीसपाटील पद्माकर आबा पाटील, सरपंच नंदलाल पाटील, उपसरपंच बारकुनाना पाटील, प्रा मच्छीन्द्र साळुंखे, बंटी शिंदे, सचीन डाभे, विनायक शिंदे, दत्तात्रय पाटील, शशिकांत शिंदे, किशोर शिंदे, भागवत शिंदे, सागर शिंदे, गौरव शिंदे, प्रभाकर शिंदे, प्रदीप शिंदे, साई शिंदे, दीपक शिंदे, कांतीलाल शिंदे, नरसिंह चव्हाण, मयूर नन्नवरे, घनश्याम पाटील, भैय्या नायदे, संजय पाटील, राजू देशमुख, मार्तंड कोळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.