अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज सायंकाळी 4 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 लाख कोटींच्या विशेष पॅकेजची घोषणा केली होती. या पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा अर्थमंत्री करणार आहेत.
नवी दिल्ली : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळं देश ठप्प झाला आहे. मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद झाले आहेत. यात सरकारकडून काही प्रमाणात उद्योगांना चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण 20 लाख कोटीच्या पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करणार आहेत. आज सायंकाळी 4 वाजता आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत घोषणा करणार आहेत. या पॅकेजच्या दुसऱ्या टप्प्याची घोषणा करताना समाजातील शेवटच्या टप्प्यातील लोकांपर्यंत मदत पोहोचवण्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला होता.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी काल आपल्या दुसर्या पत्रकार परिषदेत स्थलांतरित कामगार, पथ विक्रेते, छोटे व्यापारी आणि छोटे शेतकरी याबद्दल घोषणा केली होती. 31 मे पर्यंत शेतकऱ्यांना व्याजातून सूट देण्यात येणार आहे. तसेच परप्रांतीय कामगारांना पुढील दोन महिने मोफत धान्य मिळणार असून. कार्ड नसलेल्यांना पाच किलो रेशन देण्यात येणार असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली होती.