जळगाव -(साथीदार वृत्तसेवा) शहरातील खासगी प्रयोगशाळेत जळगाव व भुसावळ येथील पाच व्यक्तींचे नमुने तपासणीला दिले होते. या नमुन्यांचे अहवाल रविवारी रात्री उशिरापर्यंत प्राप्त झाले. यामध्ये पाचही करोना विषाणू संसर्ग अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.
पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव शहरातील जिल्हा पेठेतील एक व ईश्वर काॅलनीतील एका व्यक्तीचा तर भुसावळ येथील तीन व्यक्तींचा समावेश.
भुसावळमधील पाॅझिटिव्ह आढळलेल्या तीनपैकी दोन व्यक्ती डाॅक्टर आहेत. जळगाव जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५० झाली असून, ५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १९५ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.