नाशिक – (साथीदार वृत्तसेवा) नाशिक विभागात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत २१ मेपर्यंत ४८ हजार २८० मेट्रिकटन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आल्याने संकटाच्या काळात गरजू नागरिकांना दिलासा मिळत आहे. एप्रिल महिन्यात अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील शिधापत्रिकाधारकांना ६२ हजार ८५४ मे.टन अन्नधान्य वितरीत करण्यात आले होते. तर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत ५५ हजार ९८० मे.टन मोफत तांदूळ वितरीत करण्यात आले होते.
मे महिन्यात विभागासाठी एकूण ७० हजार ८६३ मे.टन अन्नधान्य मंजूर करण्यात आले असून त्यात गहू, तांदूळ, साखर आणि डाळीचा समावेश आहे. अत्यंत कमी किमतीत हे धान्य अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
जिल्हानिहाय अन्नधान्य वाटप
नाशिक – ७१ टक्के
अहमदनगर – ७७टक्के
जळगाव – ६६ टक्के
धुळे – ८० टक्के
नंदुरबार – ८४ टक्के
एकूण ८ हजार ३७५ स्वस्त धान्य दुकानांवर ९८.७७ टक्के धान्य पोहोचविण्यात आले आहे.
एप्रिल महिन्यात २५ लाख १२ हजार नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
केशरी कार्डधारकांनादेखील मे महिन्यापासून कमी किमतीत धान्य उपलब्ध करून देण्यात येत असून, नाशिक जिल्ह्याने २,६८३ मे.टन, अहमदनगर ३,२८५, जळगाव २,७७१, धुळे १,६९० आणि नंदुरबार जिल्ह्यात ५३२ मे.टन अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. कार्ड ऑनलाइन न झालेल्या पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्नदेखील शासनस्तरावर करण्यात येत आहे.