जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, चोपडा, अमळनेर, पाचोरा, भडगाव येथील करोनाबाधित दिवसेंदिवस वाढतच आहेत. सोमवार दि २५ मे आणि मंगळवारी दि २६ मे दुपारपर्यंत प्राप्त करोना संशयित व्यक्तींच्या स्वॅब अहवालात सोमवारी दुपारी २४ व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेत. तर पाच व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले असून, एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला होता. पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती भुसावळ शहरातील फालक नगर, गुंजाळ काॅलनी, गांधीनगर
व दीपनगरातील आहे.
यानंतर प्राप्त संशयित व्यक्तीपैकी ५५ व्यक्तींचे तपासणी अहवालात ५० व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आलेत. तर चार व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले. तसेच एका व्यक्तीचा पुर्नतपासणी अहवालही पाॅझिटिव्ह आला.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये चोपडा येथील तीन तर भुसावळ शहरातील एकाचा समावेश होता.
दरम्यान, सोमवारी रात्री उशिरा प्राप्त ११० करोना संशयित व्यक्तींपैकी १०१ तपासणी अहवाल निगेटिव्ह, तर नऊ व्यक्तींचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. यामध्ये भुसावळचे ४, यावलचे २ तर सावदा, एरंडोल व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे.
मंगळवारी पुन्हा तीन पॉझिटिव्ह वाढले
जळगाव, मुक्ताईनगर, भडगाव, भुसावळ, पाचोरा, अमळनेर, यावल, रावेर येथे स्वॅब घेतलेल्या २७३ करोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल मंगळवारी दि २६ मे रोजी सकाळी प्राप्त झाले.
यापैकी २७० तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत, तर तीन व्यक्तींचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत. पाॅझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तीमध्ये जळगाव, रावेर व अमळनेरच्या प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे .
जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रुग्णांची संख्या ४७१ इतकी झाली असून, जिल्ह्यातील आतापर्यंत १९५ रुग्ण करोनावर मात करून बरे झाले आहेत. तर जिल्ह्यातील ५४ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या –
भुसावळ – १२१
अमळनेर – १११
जळगाव शहर – १०७
भडगाव – ४७
चोपडा – २३
पाचोरा – २३
यावल – ११
धरणगाव – ११
रावेर – ०४
जामनेर – ०३
एरंडोल – ०३
जळगाव (ग्रामीण) – ०३
पारोळा – ०१
चाळीसगाव – ०१
इतर – ०२
एकूण रुग्ण – ४७१