जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत अथवा कोणत्याही राज्य योजनेत समाविष्ट नसलेल्या बिगर शिधापत्रिकाधारकांना माहे मे व जुन २०२० या दोन महिन्याच्या कालावधीकरीता प्रती व्यक्ती ५ किलो मोफत तांदुळ देण्यात येणार आहे.
बिगर शिधापत्रिकाधारकांना मोफत तांदुळ वितरणाकरीता मजुरांच्या स्थलांतरासाठी केलेल्या नियोजनामधुन कामगार/मजुर इ. बिगर कार्डधारकांची स्थानिक यंत्रणा तसेच संबंधीत गावाचे तलाठी/ग्रामसेवक यांच्याकडे आधारकार्डासह सदस्यांची नावे द्यावी. तसेच शहरी भागातील मनपा हद्दीतील बिगर शिधापत्रिकाधारकांनी तहसिल कार्यालय आवारातील सेतू सुविधा केंद्रात १ जून, २०२० पर्यंत सकाळी ११ ते दुपारी ४ यावेळेत नाव नोंदणी करावी, असे तहसीलदार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
जिल्ह्यातील बिगर शिधापत्रिका धारकांनी सेतू सुविधा केंद्रात १ जूनपर्यंत नावनोंदणी करावी
