चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील तापी फाउंडेशन व सत्यंवद फाउंडेशन यांच्यावतीने (इम्युनिटी) रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या होमिओपथीक औषधीचे दोंदवाडे गावात दि. ३१ मे रोजी मोफत वाटप करण्यात आले.
दोंदवाडे माजी उपसरपंच मनोज पाटील, पोलीसपाटील नितीन पाटील व सामाजिक कार्यकर्ते गजानन कोळी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात २ कुटुंबांना वाटप करून उपक्रमास प्रारंभ करण्यात आला.
सध्या करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व त्यावर कोणत्याही प्रकारची औषधी उपलब्ध नाही. अशावेळी नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) वाढविणे हाच एकमेव पर्याय आहे. त्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ‘आर्सेनिक अल्बम ३०’ ही होमिओपथीक औषधी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य करत आहे. याचबरोबर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिचे कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता या गोळ्यांचे गावातील सर्व कुटुंबाना मोफत वाटप केले जाणार आहे.
पहिल्यादिवशी एकूण ६० कुटुंबांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी आर्सेनिक अल्बम३० या गोळ्यांचे वाटप करण्यात आले.
या वेळी प्रा. यशवंत पाटील, अरूण पाटील, सुनिल बाविस्कर, लिलाधर बाविस्कर, अनिल शिवाजी बाविस्कर यांनी सोशल डिस्ट्न्सींगचे पालन करून गावात घरोघरी जाऊन औषधीचे वाटप केले. तसेच ग्रामस्थांना औषधीचे महत्त्व व उपयोग याविषयी माहिती देऊन पथ्य पाळण्यासह काळजी घेण्याचे आवाहन केले.
उपक्रम यशस्वीतेसाठी श्री. दादा सेवा समिती व ग्रामविकास समितीचे सहकार्य लाभत आहे.