चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) शहरातील शेतकी संघाच्या गोडाऊनमध्ये आमदार सौ. लताताई चंद्रकांतजी सोनवणे यांच्या हस्ते मका आणि ज्वारी खरेदीचा शुभारंभ करण्यात आला.
या वेळी मका हा प्रतिक्विंटल १७६० रुपयेप्रमाणे हेक्टरी ५४.५० क्विंटल मका खरेदी केला जाईल, तसेच ज्वारी प्रतिक्विंटल २५५० रुपये भावाप्रमाणे व हेक्टरी १९.५० क्विंटल एवढी खरेदी केली जाईल, असे सांगण्यात आले. यासाठी बारदानची कमतरता पडणार नाही याचीही दक्षता घेतली जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले. याप्रसंगी तहसीलदार अनिल गावित, माजी पं. स. उपसभापती एम. व्ही. पाटील, घनश्यामअण्णा पाटील, बाजार समिती सभापती नारायण पाटील, शहरप्रमुख आबा देशमुख, नगरसेवक किशोर चौधरी, भैय्या पवार, शेतकी संघ चेअरमन एल. एन. पाटील, गिरीश पाटील, नगरसेवक राजेंद्र देशमुख, मनिषाताई जयस्वाल, जीवनभाऊ चौधरी, रमेश आण्णा, कांतीलाल आबा, नरेश महाजन, राजेंद्र जयस्वाल, तालुका संघटक सुकलाल कोळी, युवा सेना उपजिल्हाप्रमुख दीपक चौधरी आदी उपस्थित होते.