मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) राज्यात दि. ५ जून रोजी १४७५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात ३५ हजार १५६ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ४२ हजार २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सध्या राज्यात ४६ शासकीय आणि ३७ खासगी अशा एकूण ८३ प्रयोगशाळा कार्यरत आहेत. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ५ लाख २२ हजार ९४६ नमुन्यांपैकी ८० हजार २२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५ लाख ४५ हजार ९४७ लोक होम क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाइन सुविधांमध्ये ७२ हजार ३७५ खाटा उपलब्ध असून, सध्या ३० हजार २९१ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. आज दिवसभरात १३९ करोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली.