चोपड्यात भाजपचे निवेदन सादर चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोव्हिड – १९ करोना संदर्भात राज्य शासन आणि जिल्हाधिकारी यांनी करोना रुग्णाचे नाव जाहीर किंवा प्रसिद्ध करू नका असे आदेश असतानाही आरोग्य विभागाकडून पत्रकारांना माहिती देताना नियमांचा गोपनियतेचा भंग झालेला आहे. म्हणून संबंधित दोषींवर गुन्हे दाखल करा अशा आशयाचे मागणीचे निवेदन चोपडा तहसीलदार यांना भारतीय जनता पार्टीचे वतीने शुक्रवारी दि. ५ जून रोजी देण्यात आले.
यावेळी भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक गजेंद्र जैसवाल यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
निवेदनावर जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रदीप पाटील माजी तालुकाध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती आत्माराम म्हाळके, तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सरचिटणीस हणमंत महाजन, मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, उपाध्यक्ष देविदास पाटील, प्रवीण चौधरी, औद्योगिक वसाहत अध्यक्ष राजू शर्मा, तालुका शेतकरी सह. खरेदी विक्री संघ माजी चेअरमन हिम्मतसिंग पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, सरचिटणीस रितेश शिंपी, व्यापारी आघाडी शहराध्यक्ष हेमंत जोहरी, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुरेश चौधरी आदींच्या स्वाक्षरी आहेत.
या झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांसह रावेर लोकसभा मतदारसंघात संतापाची लाट उसळलेली असून, सर्वांच्या भावना संतप्त आहेत.
आरोग्य विभागातील संबंधित अधिकाऱ्याविरुद्ध कोव्हिडं -१९ च्या नियमाचा गोपनीयतेचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी भाजपा तालुका उपाध्यक्ष देविदास पाटील (देवाबापू), उपाध्यक्ष गोपाल पाटील, विकास पाटील, प्रवीण चौधरी, ओबीसी सेल शहराध्यक्ष सुरेश चौधरी, प्रसिद्धीप्रमुख यशवंत जडे, कार्यालयीन मंत्री मोहित भावे, लक्ष्मण पाटील, चोपडा तालुका तापी सह. सूतगिरणी संचालिका रंजना नेवे, वंदना पाटील, माधुरी अहिरराव, रंजना मराठे, विकास शिंदे उपस्थित होते. यावेळी सर्वांनी फिजिकल डिस्टन्सचे पालन केले.