चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापनदिवस आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या वाढदिवसानिमित्त वर्डी येथे रक्तदान शिबीर घेण्यात अाले. या प्रसंगी अरुणभाई गुजराथी, अाशिषभाई गुजराथी, जीवनभाउ चौधरी, चंद्रहासभाई गुजराथी, सुनिलभाई जैन, राजेंद्र पाटील, प्रफ्फुल पाटील आदी मान्यवर उपस्थीत होते.
सदर शिबीराचे अायोजन डाॅक्टर सेलचे तालुका अध्यक्ष डाॅ. कान्तीलाल पाटील, माजी पं. स. सदस्य विश्वनाथ दौलत पाटील, माजी जि. प. सदस्य बाळासाहेब पाटील, बाळासाहेब चव्हाण, पोलीसपाटील पदमाकर नाथ, लहुश धनगर यांनी केले होते. शिबीरास गोदावरी फाॅउन्डेशन जळगाव यांचे सहकार्य लाभले.