चोपडा येथील विवेकानंद विद्यालयातील उपक्रम
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) येथील विवेकानंद विद्यालयाचे कलाशिक्षक राकेश राजकुमार विसपुते यांच्या कल्पनेतून व कलेतून विद्यालयाच्या दर्शनी भिंतीवर ३० चौरस फूट क्षेत्रफळात ‘हम स्कूल के बच्चे खुद की रक्षा खुद करेंगे’ या आशयाचं करोनाव्हायरसवर आधारित भित्तीचित्र साकारण्यात आले.
कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या कल्पनेतून त्यांनी चित्रात असे दाखवले आहे की, शाळा सुरू झाल्यानंतर मुलं शाळेत आल्यावर ती एकमेकांना भेटणारचं. नकळत त्यांचा एकमेकांना स्पर्श होणारच. यावर उपाय म्हणून चित्रात मुलांनी सोशल (फिजिकल ) डिस्टंसिंग रिंग परिधान केली आहे. ज्यामुळे ते एकमेकांजवळ येऊ शकत नाहीत व सर्वांनी तोंडाला मास्क लावले आहेत, हातात सॅनिटायझरची बॉटल असल्यामुळे covid-19 अर्थात नोवल करोनाव्हायरस पासून स्वतःचे रक्षण खूप चांगल्या प्रकारे साधता येईल. शाळा सुरू झाल्यावर मुलं -पालक – शिक्षक हे शाळेत आल्यावर त्यांनी चित्र पाहिल्यानंतर या सर्व प्रक्रिया ते न सांगता करतील असा विश्वास वाटतो. महाराष्ट्राबरोबर संपूर्ण भारतभर सर्व शाळा, महाविद्यालयात असे जनजागृती चित्र काढली जावीत अशी इच्छासुद्धा राकेश विसपुते यांनी व्यक्त केली. या नावीन्यपूर्ण उपक्रमासाठी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी एन. पी. रावळ, जळगाव जिल्हा शिक्षणाधिकारी बी. जे. पाटील, उपशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, शिवदे साहेब,अखिल महाराष्ट्र शैक्षणिक कलाशिक्षक संघाचे राज्य सचिव शालिग्राम भिरूड, चोपडा तालुका गटविकास अधिकारी बी.एस. कोसोदे, जळगांव शिक्षणविस्तार अधिकारी किशोर वायकोळे, गटशिक्षणाधिकारी डॉक्टर भावना भोसले, शाळा केंद्रप्रमुख दीपक पाटील, विवेकानंद प्रतिष्ठान व संशोधन केंद्राचे अध्यक्ष डॉ. विजय पोतदार, संस्थापक अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनश्याम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, मुख्याध्यापक नरेंद्र भावे, जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष एन. ओ. चौधरी, सचिव अरुण सपकाळे, उपाध्यक्ष दिनेश बाविस्कर, चोपडा तालुका कलाअध्यापक संघ अध्यक्ष सुनील पाटील यांची प्रेरणा व प्रोत्साहन लाभले तर उपशिक्षक पवन लाठी, हेमराज पाटील यांचे सहकार्य लाभले.
याचबरोबर विशेष प्रेरणा व प्रोत्साहन कृतिशील शिक्षक महाराष्ट्राचे राज्य संयोजक विक्रम अडुळसर, ज्योती बेलवले ,नारायण मंगलारम, प्राचार्य राजेंद्र महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.