मुंबईत घेतला अखेरचा श्वास
रावेर – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तथा रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार हरिभाऊ जावळे (वय ६७) यांचे आज सुमारे दुपारी १२.३० वा. मुंबई येथे उपचारादरम्यान निधन झाले.
ते सध्या भाजप जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहत होते त्यांच्यावर गेल्या काही दिवसापासून मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु होते. आज, दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.
हरिभाऊ जावळे हे अतिशय मनमिळाऊ नेते म्हणून परिचित होते. त्यांनी रावेर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. याचबरोबर यावल विधानसभा मतदारसंघातही ते निवडून आले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच जनसंघाचे त्यांनी काम केले होते.