जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) करोनाचा कहर जळगाव जिल्ह्यात कायम असून, गुरुवारी दि. १८ जून रोजी दुपारी तब्बल १३५ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले. यामध्ये सर्वाधिक २३ रुग्ण चोपडा तालुक्यातील असून, त्या खालोखाल २१ रुग्ण जळगाव शहरातून सापडले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या २०२० वर गेली आहे.
दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात आणखी ११० रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १०५७ बाधित करोनामुक्त झालेले आहेत, तर १५१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
गुरुवारी दुपारी आलेल्या अहवालांमध्ये चोपडा २३, जळगाव शहर २१, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ ११, अमळनेर १६, जामनेर १२, धरणगाव ८, एरंडोल ८, रावेर ८, यावल ६, पारोळा १३, भडगाव १ आणि पाचोरा ३ असे तालुकानिहाय पॉझिटिव्ह आढळून आले.
करोनाचा दिवसेंदिवस प्रसार वाढत असल्याने जळगाव जिल्ह्यातील लोकांनी काळजी घ्यायलाच हवी. सुरक्षित अंतर ठेवणे, बाहेर निघताना मास्क वापरणे, आपले हातपाय स्वच्छ धुवून घेणे, सॅनिटायझर वापरणे यासारख्या सूचनांचे नागरिकांनी अवश्य पालन करावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.