जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात आज, २१ जून रोजी सायंकाळपर्यंत आलेल्या करोना अहवालांत नवीन १३२ करोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या २२८१ इतकी झाली असून, सर्वाधिक करोना पॉझिटिव्ह तब्बल २७ जण चोपडा येथील आहेत.
पाचोरा, भडगावात वाढता प्रादूर्भाव
रविवारी पाचोऱ्यात ५ तर भडगावात १४ नवीन करोनाबाधित आढळले. यात पाचोरा तालुक्यातील वरखेडी येथील ४५ वर्षीय पिता व १७ वर्षीय पुत्रीचा समावेश आहे. तसेच तारखेडा येथील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर पाचोरा शहरातील हनुमान नगर भागातील ३५वर्षीय पुरुष व नुरानी नगर भागातील ३४ वर्षीय पुरुषाचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला.
चोपडा पुन्हा २७ करोनाबाधित
चोपडा येथे रविवारी (दि. २१) प्राप्त ९० अहवालांमध्ये ६३ निगेटिव्ह तर २७ पॉझिटव्ह आले. त्यात ग्रामीण भागातील ११ जणांचा समावेश आहे. त्यात मामलदे २, चुंचाळे ४, मंगरूळ १, अकुलखेडा ४ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. याचबरोबर चोपडा शहरातील पंकज नगर २, प्रभात कॉलनी १, मेन रोड १, तेलीवाडा ३, गुजरअळी १, सुभाष चौक १, शिव कॉलनी १, फुले नगर २, मल्हापुरा १, पटवे अळी १, पाटीलगढी १, बोरोले नगर १ असे एकूण १६ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप लासूरकर यांनी दिली. आतापर्यंत चोपडा तालुक्यातील एकूण २०० करोनाबाधित झाले असून, त्यापैकी ८७ रुग्ण बरे झाल्याचेही डॉ. लासूरकर म्हणाले.
आज आलेले तालुकानिहाय रुग्ण :
चोपडा २७
पारोळा १३
जळगाव ग्रामीण ६
जळगाव शहर १८
भुसावळ १०
अमळनेर २
पाचोरा ५
भडगाव १८
धरणगाव ३
चाळीसगाव ७
यावल ५
जामनेर २
एरंडोल ४
रावेर ८
मुक्ताईनगर २
इतर जिल्ह्यांतील २
एकूण करोनाबाधित : १३२