• Sat. Jul 5th, 2025

२५ जून २०२० गुरुवार

*मेष
उत्साही असाल, अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुम्हाला पैश्याची अत्यंत आवश्यकता असेल. तुमच्यापैकी काही जणांकडून गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. 

*वृषभ
सकारात्मकता आज महत्वाची असेल. कार्यभाग साधल्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. नोतवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू मिळतील. अनपेक्षित स्रोतांकडून तुम्हाला महत्त्वाची आमंत्रणे मिळतील. 

*मिथुन
सकारात्मक विचार आमलात आणा, अनावश्यक विचारांना थारा देऊ नका. शांत आणि तणावरहित राहण्याचा प्रयत्न करा, त्यातूनच तुमचा मानसिक कणखरपणा वाढेल.   समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताण तणावाचे मळभ असेल. आज तुमचे जवळचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील.

*कर्क
कलात्मक आनंद देणा-या कामात स्वत:ला गुंतवून घ्या. आकर्षक वाटणा-या योजनेत गुंतवणूक करण्यापूर्वी वरवर विचार न करता त्याच्या मूळाशी जा. गुंतवणूक करण्यापूर्वी आणि कोणताही शब्द देण्यापूर्वी तज्ञांशी बोलून घ्या.  तुमची बाजू वरचढ ठरवायची असेल तर तुम्हाला अतिशय सुयोग्यरित्या मार्ग अवलंबावा लागेल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला चमकवेल. आपल्या भागीदारांना गृहीत धरू नका. 

*सिंह
आज आपली उर्जा चांगली असेल, प्रसन्नतेने कामाला सुरुवात कराल. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार आहे. आपले प्रश्न सोडविण्यासाठी ते मदत करेल आणि योग्य तो प्रकाशमार्ग दाखवेल. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. आपल्या नव्या योजना आणि उपक्रमाबद्दल पालक कमालीचे उत्साही असतील. वेळ पाहून आज तुम्ही सर्व लोकांसोबत दुरी बनवून एकांतात वेळ घालवणे पसंत कराल. 

*कन्या
अपेक्षित ध्येयासाठी कठोर परिश्रम घ्या. या प्रसंगी नातेवाईक देखील तुम्हास मदत करतील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. वेळेचा सदुपयोग करा.

*तुळ
आजच्या दिवशी आपल्या खर्चावर नियंत्रण मिळवा, चैनीसाठी पैशांची उधळपट्टी होणार नाही याची काळजी घ्या. कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. वैयक्तीक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. कोणताही नवीन प्रकल्प हाती घेताना नीट विचार करा. आज रिकाम्या वेळेत रचनात्मक काम करण्याचा प्लॅन बनवाल. 

*वृश्चिक
आर्थिक स्थितीतील बदल होतील. आज तुमच्याकडे तग धरून राहण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. सकारात्मक विचाराने पुढे जा. मनातील आशय सहकार्याकडे बोला. त्यातून सूचक मार्ग निघेल.

*धनु
तुम्हाला यश मिळेल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते. सुयोग्य कर्मचा-यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. तुमची विनोदबुद्धी तुमचा सर्वोत्कृष्ट गुणविशेष आहे.

*मकर
दिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करा. त्यामुळे पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढने दृष्टीपथात येईल. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला आपल्या कामांना वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 

*कुंभ
तुमची बचतीची सवय तुम्हाला दीर्घकाळ योजनेसाठी फायदेशीर ठरेल. अतिशय व्यस्त असूनही तुम्ही आरोग्य चांगले राखल्यामुळे थकवा येणार नाही. आज तुम्हाला चांगल्यापैकी पैसा मिळणार आहे. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्हाला सर्व काही अनुकूल असेल. तुम्ही मोबाइल किंवा टीव्हीवर आवश्यकतेपेक्षा जास्त वेळ घालवू शकतात.

*मीन
आपल्या नियोजित कामात कुटुंबातील सदस्य पाठिंबा देतील पण त्याचबरोबर त्यांच्या अपेक्षादेखील वाढलेल्या असतील. दिवसभरात काही यश मिळवाल असे दिसते – काही सहकार्‍यांकडे लक्ष द्या. अध्यात्मिक गुरु अथवा वडीलधा-यांकडून मार्गदर्शन लाभेल.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.