नंदुरबार (साथीदार वृत्तसेवा) हवामान खात्याने जिल्ह्यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. तलाठी,मंडळ अधिकारी व तालुका स्तरीय अधिकारी यांनी याबाबत आवश्यक ती खबरदारी घेवून मुख्यालय सोडू नये.
मंडळ निहाय पावसाचा व नुकसानीचा अहवालाची माहिती तालुका नियंत्रण कक्षात द्यावी व दर दोन तासांनी जिल्हा नियंत्रण कक्षास अहवाल पाठवावा. तालुका मुख्यालयाचा नियंत्रण कक्ष चोवीस तास कार्यरत ठेवावा. जिल्ह्यातील नदीपात्रामध्ये पाण्याची पातळी वाढून पूर येण्याची शक्यता लक्षात घेता नदीकाठालगतच्या नागरीकांनी सतर्क रहावे. व योग्य दक्षता घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.