चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) पन्नास वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या शहरातील रोटरी क्लब ऑफ चोपडाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाच्या (२०२०-२१) अध्यक्षपदी उद्योजक नितीन अहिरराव यांची तर मानद सचिवपदी अॅड. रुपेश पाटील यांची निवड झाली आहे.
सन २०१३ पासून नितीन अहिरराव रोटरीत सक्रीय असून, त्यांनी विविध कमिटीवर चेअरमनपदी तसेच रोटरीच्या उपाध्यक्षपदी काम केले आहे. विशेष म्हणजे, चोपड्यात गेल्यावर्षी झालेल्या रोटरी महोत्सवाचे यशस्वी आयोजन त्यांच्या चेअरमनशिपमध्ये घेण्यात आले होते. नक्षत्र ज्वेलर्सचे संचालक म्हणून ते सराफबाजारात कार्यरत आहेत. रुपेश पाटील ग्रीन ग्लोब बायोटेक्नॉलॉजी कंपनीचे संचालक असून, ते चोपडा साखर कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. घनश्याम निंबाजी पाटील यांचे सुपुत्र आहेत. त्यांनी क्लबमध्ये विविध कमिट्यांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
नूतन अध्यक्ष नितीन अहिरराव यांनी कार्यकारिणीची घोषणा केली असून त्यात कोषाध्यक्ष – अर्पित अग्रवाल, उपाध्यक्ष – पंकज बोरोले, सार्जंट अॅट आर्मस – भालचंद्र पवार आहेत. इतर समित्यांच्या चेअरमनपदी अशिष गुजराथी, संजीव गुजराथी, अविनाश पाटील, प्रसन्न गुजराथी, डॉ. नीता जैस्वाल, विलास एस. पाटील तर क्लब ट्रेनर म्हणून एम. डब्ल्यू. पाटील तसेच सल्लागार समितीमध्ये डॉ. शेखर वारके, अॅड. अशोक जैन व इतर समित्यांमध्ये बाकी सदस्यांच्या समावेश आहे.

करोना संसर्गच्या पाश्र्वभूमीवर रोटरी क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येत्या, १० जुलै रोजी ऑनलाइन पध्दतीने होणार असल्याची माहिती क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.