• Sat. Jul 5th, 2025

सावधान, जिल्ह्यातील करोनाबाधित चार हजारापार; २०९ नवीन रुग्ण

जळगाव जिल्ह्याची रुग्णसंख्या ४००७

जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यात करोनासंसर्ग वेगाने होत असून, जिल्हावासीयांनी सावधान होण्याची आवश्यकता आहे. शुक्रवारी, ३ जुलै सायंकाळी प्राप्त अहवालांमध्ये तब्बल २०९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आलेत. यानुसार जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या चार हजारापार गेली असून, एकूण ४००७ झाली आहे.

आज आलेल्या अहवालात सर्वाधिक कोरोनाबाधीत हे जळगाव शहरात ५५ रुग्णआढळले आहेत. चिंतेची बाब म्हणजे, आज सहा जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने करोनाबळींची संख्या अडीचशेच्या वर गेली आहे. यात जळगाव शहरातील ३, बोदवड, पाचोरा व जामनेर तालुक्यातील प्रत्येक एका रुग्णाचा समावेश आहे.

आज तालुकानिहाय आढळलेले रुग्ण :    जळगाव शहर ५५, जळगाव ग्रामीण १३, चाळीसगाव ४, अमळनेर ८, भडगाव १३, चोपडा ११, धरणगाव ६, एरंडोल २८, जामनेर ७, बोदवड १, मुक्ताईनगर १, पाचोरा १, पारोळा २२, रावेर १०, भुसावळ १८, यावल ११ रुग्ण आढळून आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिली आहे.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.