जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आदेश जळगाव (साथीदार वृत्तसेवा) जिल्हयातील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी ही परिस्थिती लक्षात घेता जळगाव शहर महानगरपालिका, भुसावळ आणि अमळनेर नगरपालिका क्षेत्र या ठिकाणी दि. ७ जुलैच्या पहाटे ५ वाजेपासून ते १३ जुलैच्या रात्री १२ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी आदेश काढले आहेत.