जळगाव – (साथीदार वृत्तसेवा) जिल्ह्यातील भुसावळ, जळगाव, पारोळा व चोपडा येथे स्वॅब घेतलेल्या 30 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. यापैकी 16 व्यक्तींचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील चार, भुसावळ येथील दहा रुग्णाचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 257 इतकी झाली असून त्यापैकी 45 व्यक्ती कोरोनामुक्त होऊन घरी गेल्या आहेत तर तीस कोरोना बाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यात अनखी चौदा करोना बाधित रूग्ण आढळले; रुग्णसंख्या २५७ वर
covid19 test 