चोपड्यात भाजपचे तहसीलदारांना निवेदन
चोपडा (साथीदार वृत्तसेवा) कोरोना महामारीमुळे मजुरांचे हातचे काम गेले आहे, तर निसर्गाच्या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यावर आपत्ती कोसळल्यामुळे त्यांना हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. अश्या परिस्थितीत कुटुंम्बाचे पालन पोषण, मुलांच्या शैक्षणिक गरजा कश्या पूर्ण कराव्यात हा यक्ष प्रश्न त्यांना पडला आहे. तरी राज्य शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सत्र 2020 – 2021साठी पाठयपुस्तक व लेखन साहित्य मोफत पुरवठा करावा अशी मागणीचे निवेदन भारतीय जनता पार्टीतर्फे तहसीलदार अनिल गावित यांना देण्यात आले.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रकाश लक्ष्मण पाटील, शहराध्यक्ष तुषार पाठक, यांचे हस्ते निवेदन देण्यात आले. निवेदनावर भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज पाटील, शहराध्यक्ष गजेंद्र जैसवाल, माजी तालुकाप्रमुख व पंचायत समिती सभापती आत्मारामभाऊ म्हाळके, जिल्हा सरचिटणीस राकेश पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रदीपभाऊ पाटील, जिल्हा परिषद सदस्य गजेंद्र सोनवणे, कृषि उत्पन्न बाजार समिती संचालक धनंजय पाटील, औद्योगिक वसाहत चेअरमन तथा माजी शहराध्यक्ष राजु शर्मा, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नरेंद्र पाटील, उपाध्यक्ष देविदास (देवाबापू )पाटील , विठ्ठल पाटील, लक्ष्मण माळी, शहर सरचिटणीस मनोहर बडगुजर, सुनील सोनगिरे, चिटणीस गणेश पाटील, भरत सोनगिरे, अनुसूचित जाती जमाती सेल अध्यक्ष राज घोगरे, भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस रितेश शिंपी, प्रसिद्धीप्रमुख यशवंत जडे, कार्यालय मंत्री मोहित भावे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या सह्या असून, निवेदन सादर करताना सर्व उपस्थित होते.