• Sat. Jul 5th, 2025

मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक मुंबईच्यावतीने २१ लाख १९ हजारांचा धनादेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुपूर्द

मुंबई – (साथीदार वृत्तसेवा) ‘कोरोना’च्या लढ्यासाठी ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी दिला आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा पगार कोरोनाच्या लढ्यासाठी दिला आहे. माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार अभिजित अडसूळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मंत्रालय येथे काल (दि.15) हा धनादेश सुपूर्द केला. यावेळी बँकेचे पदाधिकारी प्रदीप पाटील, धर्मराज मुंडे, सरव्यवस्थापक दिलीप दिघे उपस्थित होते.

‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. या उपाययोजनांसाठी निधी उपलब्ध व्हावा म्हणून राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी-कोविड-19’ हे स्वतंत्र बँक खाते उघडले आहे. कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकारसोबत अनेक व्यक्ती, औद्यागिक संस्था, स्वयंसेवी संस्था, धार्मिक संस्था, वित्तीय संस्था पुढे येत आहेत.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी समाजाच्या विविध क्षेत्रातील संस्थांना आणि व्यक्तींना यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत ‘दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लि. मुंबई’ च्यावतीने 21 लाख 19 हजार 440 रुपयांचा धनादेश ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19’साठी देण्यात आला आहे.


By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.