चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) येथील इनरव्हील क्लबतर्फे श्रावण महिन्याचे स्वागत वृक्षारोपण कार्यक्रमच्या माध्यमातून करण्यात आले.
हरेश्वर मंदिर परिसरातील हतनूर वसाहतीतील श्री अष्टविनायक मंदिराच्या परिसरात ५० वृक्षांचे रोपण करण्यात आले.
याप्रसंगी क्लब अध्यक्षा शैला सोमाणी, सचिव अंकिता जैन, माजी अध्यक्ष डॉ. कांचन टिल्लू, पदाधिकारी चेतना बडगुजर, ज्योती वारके, सीसी किरण पालीवाल, मीना पोतदार, सीमा पाटील, चंचल जयस्वाल, पारुल जैन आदी सदस्या उपस्थित होते.
