• Sat. Jul 5th, 2025

चोपड्यात श्रीराम मंदिर कारसेवकांचा सन्मान

राष्ट्रीय सुरक्षा मंचचा स्तुत्य उपक्रम

चोपडा – (साथीदार वृत्तसेवा) जगभरात बहुचर्चित असलेल्या प्रभू श्रीराम यांच्या भव्य मंदिराचा भूमिपूजन सोहळा बुधवार दि ५ ऑगस्ट सकाळी अभिजित मुहूर्तावर अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आला. दरम्यान, सन १९९१ साली श्रीराम मंदिर निर्माणसाठी चोपड्यातून कारसेवेसाठी रामभक्त कार्यकर्ते रेल्वेने गेले होते. या कार्यकर्त्यांचा कौटुंबिक सत्कार राष्ट्रीय सुरक्षा मंचद्वारे बुधवारी सकाळी करण्यात आला.

प्रारंभी सकाळी दहा वाजता गांधी चौकातील श्रीराम मंदिरात राष्ट्रीय सुरक्षा मंचच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी सुरक्षित अंतर बाळगत पूजन केले. यावेळी उपस्थित कारसेवकांचा शाल, श्रीफळ आणि श्रीरामांची प्रतिमा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच कार्यक्रमास उपस्थित नसलेल्या कारसेवकांच्या निवासस्थानी जावून त्यांचाही यथोचित सन्मान करण्यात आला.

सन्मानितांमध्ये ज्येष्ठ कारसेवक तिलकचंद शहा, माजी आमदार कैलास पाटील, ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, माजी नगरसेवक अनिल वानखेडे, दिलीप नेवे, सोपान जाधव (कठोरा), शामसिंग परदेशी, पवन अग्रवाल, घनःश्याम अग्रवाल, विश्वनाथ पाटील ( कठोरा), प्रकाश वाघ, पुनम भावसार, पांडुरंग चौधरी, राजूअण्णा वाणी, मुन्ना शर्मा, संजीव पाटील, विनोद पाटील, पंडित पाटील, किशोर पाटील (वेले), राजेंद्र शिंपी, सुनील माळी, छोटू माळी, रेऊबा धनगर, नवीन दिसावल, उल्हास गुजराथी, अशोक शहा (चहार्डी), राजेंद्र बडगुजर, रामदास गंभीर, कृष्णदास गुजराथी, तसेच दरम्यानच्या काळात मृत झालेले कारसेवक स्व. रघुनाथ चौधरी, विठ्ठल पाटील, श्रीकृष्ण टिल्लू, सतीश गुजराथी, गोपाळ गवळी, रवींद्र शुक्ल, हेमंत बारी यांचा समावेश आहे.

यावेळी राष्ट्रीय सुरक्षा मंचचे संयोजक गोपाळ पाटील, सदस्य अॅड. धर्मेंद्र सोनार, यशवंत चौधरी, पंकज सुभाष पाटील, नगरसेवक गजेंद्र जायसवाल, नरेंद्र पाटील, शाम सोनार, मनोज विसावे, सौरभ नेवे, संदीप पाटील, अॅड. शैलेष पाटील, सुनील सोनगिरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार अनिलकुमार पालिवाल, विश्व हिंदू परिषदेचे दिलीप नेवे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोपान जाधव यांनी आठवणींना उजाळा देत उपस्थितांना मार्गदर्शन केले.

By sathidaradmin

खानदेशातील अग्रगण्य साप्ताहिक वृत्तपत्र, मागील ३२ वर्षांपासून वाचकांना सत्य आणि योग्य पद्धतीने बातम्या पुरवत आहे. आता डिजिटल युगात, साथीदार समूह आपल्या तंत्रज्ञ वाचकांसाठी न्यूज पोर्टलच्या स्वरूपात उपलब्ध आहे. म्हणून, खानदेश परिसरातील दैनंदिन अपडेट्ससाठी कृपया आमच्या वेबसाइटला भेट द्या. तसेच, आपल्या सूचना स्वागतार्ह आहेत. धन्यवाद. संपादकीय टीम साथीदार न्यूज नेटवर्क

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या पानाची मजकूर तुम्ही कॉपी करू शकत नाही.