जळगाव - (साथीदार वृत्तसेवा) कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यात 31 ऑगस्ट, 2020 पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केलेली आहे.
विभागीय आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. कोरोना विषाणू प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या सोमवार, दिनांक 10 ऑगस्ट, 2020 या दिवशी होणारा विभागहीय लोकशाही दिनाचा कार्यक्रम वरील कारणांमुळे रद्द करण्यात आला आहे, याची सर्व नागरीकांनी नोंद घ्यावी, असे निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी कळवि
ले आहे.